शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

नवा नियम येणार! रेल्वे तिकीट बुकिंगसाठी लागणार पॅन किंवा पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:08 AM

Train Ticket booking Rule: आधारकार्डही गरजेचे : तपशील देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आता सरसकट आधारचा तपशील देणे बंधनकारक करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. सध्याच्या नियमानुसार, ६ तिकिटे विना आधार जोडणीची बुक करता येतात. त्यापुढील तिकिटांसाठी आधार तपशील द्यावा लागतो.

आयआरसीटीसी’कडून नवीन प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे. ही प्रणाली कार्यरत झाल्यानंतर १ तिकीट बुक करायचे असले तरी ओळख पडताळणी बंधनकारक असेल. ओळख पडताळणीसाठी आधारसह पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक उपयोगात आणता येऊ शकेल. आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा ॲपद्वारे रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही लॉग इन कराल, तेव्हा तुम्हाला आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक टाकावा लागेल.

रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत फसवणुकीविरोधातील कारवाई मानवी बुद्धिमत्तेवर आधारित होती. ती पुरेशी परिणामकारक नव्हती. त्यामुळे आम्ही तिकिटासाठी लॉग इन करताना पॅन, आधार किंवा इतर ओळख दस्तऐवजांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे तिकीट बुकिंगमधील फसवणूक थांबविता येऊ शकेल. आधार प्राधिकरणासोबतचे आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा स्थापन झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अरुण कुमार यांनी सांगितले की, २०१९ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दलालांवर कारवाई सुरू झाली होती, तेव्हापासून १४,२५७ दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २८.३४ कोटींची बनावट तिकिटे पकडली गेली आहेत. अरुण कुमार म्हणाले की, रेल्वे सुरक्षा ॲप विकसित केले गेले आहे. तेथे फसवणुकीबाबत तक्रारी करता येतील. ६,०४९ स्थानकांवर तसेच सर्व प्रवासी ट्रेनच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे. 

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीPan Cardपॅन कार्डpassportपासपोर्ट