(पान १ ॲंकर) तीन आठवड्यांत विहीर खोदून पाणीटंचाईवर केली मात !
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
लोगो - मरायचे नाही लढायचे !
(पान १ ॲंकर) तीन आठवड्यांत विहीर खोदून पाणीटंचाईवर केली मात !
लोगो - मरायचे नाही लढायचे !विहीर खोदून पाणीटंचाईवर मात !बेडूकवाडी टँकरमुक्त : नरेगातील विहिरीने गावच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरलाफोटो- ०७बीईडीपी २३, २४ (फोटो मेलने पाठविले आहेत)संजय तिपाले : बीड अख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न पाहता सरपंचांनी स्वत:चे दहा लाख ओतले. अवघ्या ४० फुटांवर विहिरीला पाणी लागल्याने पाण्यासाठी गावकर्यांची रानोमाळ भटकंती थांबली आहे. बाभूळवाडी (ता. बीड) या ग्रामपंचायतीअंतर्गत बेडूकवाडी, बेलवाडी ही दोन गावे येतात. यापैकी बेडूकवाडी हे साधारण तेराशे लोकसंख्येचे गाव. गावच्या डोक्यावर कायम घागर. पाऊस कितीही झाला तरी दरवर्षी टँकर ठरलेला. यंदा तर मी मी म्हणणार्या गावानेही पाणीटंचाईच्या झळा सोसल्या. त्यामुळे बेडूकवाडीकरांच्या डोक्यावर भर पावसाळ्यात घागर दिसू लागली. जुन्या योजेनतील विहीर कोरडीठाक पडल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला. गावातील तीन हातपंपांना पाणी यायचे. तेही कोरडेठाक पडले. माणसांनाच पाणी मिळणे कठीण झाले. जनावरांचे तर हाल विचारायलाच नको. पाण्यासाठी गावकर्यांची रानोमाळ भटकंती सुरू झाली. सरपंच परमेश्वर सातपूते यांनी बेडूकवाडीसाठी नरेगातून विहीर मंजूर करुन आणली. तहान लागल्यावर विहीर खोण्याचा प्रकार म्हणून हिणवले जाऊ लागले. काम पूर्ण कधी व्हायचे अन् गावाला पाणी कधी मिळायचे, असे प्रश्न उपस्थित झाले. परंतु सातपुते खचले नाहीत. तांत्रिक अधिकार्यांच्या सल्ल्याने मनकर्णिका तलावात स्थळ निश्चित करुन ऑगस्ट महिन्यात विहिरीचे खोदकाम सुरु झाले. शासननिधीची प्रतीक्षा न करता सातपूते यांनी पदरचे दहा लाख रुपये खर्च केले. २१ व्या दिवशी ४० फूटांवर पाणी लागले. बेडूकवाडीपासून मनकर्णिका तलावाचे अंतर तीन किलोमीटर आहे. या तलावापासून गावात जुन्या योजनेसाठी पाईपलाईन केलेली होती. विहिरीतील पाणी या पाईपलाईनद्वारे गावात आणणण्यात आले आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली आला! कोट विहिरीमुळे कायमचा प्रश्न मार्गी लागला. टँकरवर होणारा खर्च तर वाचलाच;पण गावकर्यांचाही त्रास वाचला. परमेश्वर सातपूतेसरपंच, बाभूळवाडी.