शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 14:23 IST

राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

पालीः राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दलित समाजातील एका अल्पवयीन मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. पाली जिल्ह्यातील जैतारणमधल्या रासठाणा भागातल्या धनेरिया गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन दलित मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं संतप्त जमावानं त्याचे हात-पाय बांधून त्याला रस्त्याच्या मधोमध उभ करून काठीनं मारहाण केली आहे.पीडित अल्पवयीन दलित मुलगा हात जोडून दयेची भीक मागत असूनही त्या जमावानं त्याला निर्दयीपणे मारहाण केली आहे. तो मुलगा हात जोडून सांगत होता की, पुन्हा कधीही मंदिरात जाणार नाही. तरीही जमावानं त्याला चोपलं आहे. कडाक्याच्या उन्हातही जमाव त्याला बेदम मारहाण करत होता. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा बनवण्यात आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1 जून रोजी या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.व्हिडीओ व्हायरल होताच आरोपींमधल्या एकानं पीडित अल्पवयीन मुलाच्या विरोधात मुलीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन दलित मुलालाच कोठडीत पाठवलं. मंगळवारी 4 जून रोजी पीडित अल्पवयीन दलित मुलाच्या मामांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपी हे वजनदार कुटुंबातील असल्यानं पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या मामानं केला आहे.