शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

तामिळनाडूत BJP-AIADMK युती होणार? अमित शांहाच्या भेटीनंतर पलानीस्वामींचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 22:38 IST

Palaniswami On Alliance: AIDMK चे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली.

Palaniswami On BJP-AIADMK Alliance: पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) चा सामना करण्यासाठी भाजप युतीचा पर्यायदेखील तपासत आहेत. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूचा मुख्य विरोधी पक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK)चे सरचिटणीस इडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी बुधवारी (26 मार्च) सूचक विधान केले.

पलानीस्वामी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर युतीबाबतच्या चर्चांवर भाष्य केले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पलानीस्वामी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने तामिळनाडूमधील अनेक समस्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. राज्याचा निधी मिळण्यात विलंब होत असल्याने निधी लवकर देण्याची विनंती केली आहे. पण, यावेळी त्यांनी स्पष्टपणे युतीवर बोलणे टाळले. 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर देण्याची गरज काय? युतीबाबतचा निर्णय निवडणुकीच्या वेळीच घेतला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

द्विभाषिक धोरणावर काय म्हणाले...पतानीस्वामी पुढे म्हणतात की, त्यांनी केंद्र सरकारकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि शिक्षणाशी संबंधित योजना (SSA) अंतर्गत तामिळनाडूसाठी प्रलंबित निधी जारी करण्याची मागणी केली. तामिळनाडू सातत्याने द्विभाषिक धोरण अवलंबत आहे आणि ते पुढेही चालू ठेवले पाहिजे. संसदीय मतदारसंघांचे प्रस्तावित सीमांकन तामिळनाडूवर विपरीत परिणाम होणार नाही, अशा प्रकारे केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम