शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लष्करातील महिला कर्नलला अश्लील फोटोवरुन ब्लॅकमेल करणा-या पाकिस्तानच्या आयएसआय एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 11:43 IST

भारतीय लष्कराच्या महिला कर्नलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणा-या आयएसआय एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपीने इक्ता शर्माच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा मॉर्फ केलेला फोटो मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर पाठवला. दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे हे प्रकरण हस्तांतरीत केले आहे.

नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय लष्कराच्या महिला कर्नलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणा-या आयएसआय एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. आयएसआयच्या हस्तकाने महिला अधिका-याकडे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा संवदेनशील ठिकाणांची माहिती मागितली होती. पण महिला अधिका-याने त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर आयएसआय हस्तकाने महिला अधिका-याचे मॉर्फकरुन बनवलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. द पायोनीरने हे वृत्त दिलं आहे. 

महिला कर्नलने तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिल्लीतील चांदनी महल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. मोहम्मद परवेझ असे आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत काम करणा-या आणखी तीन हेरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. लष्करात अधिकारी पदावर असणारी ही महिला दिल्लीत द्वारका येथे राहते. मला अज्ञात क्रमांकावरुन फोन येत आहेत तसेच इक्ता शर्मा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन आपल्याला मेसेज आल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. 

आरोपीने माझ्या व्हॉटसअॅप नंबरवर माझे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले तसेच इक्ता शर्माच्या फेसबुक आयडीवरुन मला दोन मेसेज आले होते. या महिला अधिका-याच्या मोबाइलवरही धमकीचेही फोन आले. कॉल करणा-या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर, अश्लील फोटो आणि व्यक्तीगत माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली होती. 

जेव्हा महिला कर्नलने दोन्ही नंबर ब्लॉक केले तेव्हा आरोपीने इक्ता शर्माच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा मॉर्फ केलेला फोटो मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर पाठवला. तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मोबाईल फोनच्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी चांदनी महल परिसरातून अटक केली. 

दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे हे प्रकरण हस्तांतरीत केले आहे. आरोपीने भारताच्या सुरक्षेसंदर्भात काही माहिती आयएसआयला दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात पाकिस्ताना हाय कमिशनमध्ये काम करणा-या नौशाद नावच्या व्यक्तीला परवेझने सीमकार्डही दिले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान