शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

पाकिस्तानच्या एफ-16 नी 50 किमीवरून भारतीय लढाऊ विमानांवर चार मिसाईल डागलेली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:09 PM

27 फेब्रुवारीला पाकिस्तानची तीन एफ-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली होती.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी भारतावर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने एफ-16 ही विमाने भारतीय हद्दीत घुसविली होती. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या भारताच्या लढाऊ विमानांवर पाकच्या पायलटनी 40 ते 50 किमीवरून 4-5 एम्राम मिसाईल डागल्याचा दावा करण्यात आला आहे. 

वृत्तसंस्था एनआयने दिलेल्या वृत्तानुसार 27 फेब्रुवारीला पाकिस्तानची तीन एफ-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. यावेळी भारताच्या मिग-21 बायसन आणि सुखोई-30 या विमानांनी त्यांना रोखण्यासाठी हवेत झेप घेतली. यावेळी पाकिस्तानच्या पायलटांनी या विमानावर हवेतून हवेत मारा करता येणारी अमेरिकन बनावटीची एम्राम ही मिसाईल डागली होती. इलेक्ट्रॉनिक संकेतांनुसार 4 ते 5 मिसाईल जवळपास 50 किमी लांबवरून डागण्यात आली होती. पाकिस्तानच्या हल्ल्याद्वारे भारताचे ब्रिगेडचे मुख्यालय, सेनेचे मुख्यालय आणि लष्करासाठी इंधन साठविण्यात येणारा ऑईल डेपो उडवून देण्यात येणार होते. 

या मिसाईलचे भाग शोधण्याचे काम लष्कराकडून सुरु आहे. पाकिस्तान पुरावे सापडूनही भारताविरोधात एफ-16 चा वापर केला नसल्याचा दावा करत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मिसाईलचे भाग सापडले असून हा पुरावा अमेरिकेला देण्यात येणार आहे. अन्य मिसाईचे भागही शोधण्याचे काम सुरु आहे. पाकिस्तानच्या विमानांनी डागलेली मिसाईल लक्ष्यभेद करण्यास अपयशी ठरली होती. यामुळे या मिसाईलचे अवशेष सापडल्यास पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. 

27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांना रोखताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-21 विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. त्यांना पाकिस्तानने पकडले होते. तीन दिवसांनंतर अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात आले होते. या काळातही पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आला आहे. अभिनंदन यांना 24 तास झोपू दिले नव्हते. तसेच मारहाणही करण्यात आली होती. यानंतर सोडताना अभिनंदन यांच्याकडून पाकिस्तानी लष्कराचे गुणगान करतानाचा व्हिडिओ काढून माध्यमांमध्ये पसरविला होता. 

1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झालं. यानंतर त्यांना उपचारांसाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनंदन लवकरच कॉकपिटमध्ये परतावेत, अशी इच्छा सैन्यातील अधिकाऱ्यानी बोलून दाखवली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानfighter jetलढाऊ विमान