शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

पाकचे एफ-१६ पाडणारी ‘मिग-२१’ स्क्वाड्रन या महिन्यात हाेणार निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:09 IST

२०२५ पर्यंत सर्व ‘मिग-२१’ हाेणार कायमस्वरूपी लँड; ६० वर्षांपासून देशाचे केले संरक्षण

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी मिग-२१ विमाने कायमस्वरूपी लँड हाेणार आहेत. मिग-२१ विमानांचे ‘स्वाॅर्ड आर्म’ स्क्वाड्रन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त करण्यात येऊ शकते. 

मिग विमानांची सध्या ४ स्क्वाड्रन्स आहेत. त्यात ‘स्वार्ड आर्म’चाही समावेश आहे. ही स्क्वाड्रन जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत हे स्क्वाड्रन निवृत्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तीन स्क्वाड्रनही निवृत्त करण्यात येतील. २०१९ मध्ये बालाकाेट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताच्या अत्याधुनिक एफ-१६ या विमानाला पाडण्यात आले हाेते. हा कारनामा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी केला हाेता. ते याच ‘स्वार्ड आर्म’ स्क्वाड्रनचे सदस्य हाेते तसेच मिग विमानतूनच त्यांनी पाकिस्तानचे विमान पाडले हाेते. आता ही विमाने लवकरच कायमस्वरुपी लँड हाेणार आहेत. या विमानांना २०२५ पर्यंत निवृत्त करण्यात येणार आहे. 

‘या’ युद्धांमध्ये निर्णायक भूमिकाnपाकिस्तानसाेबत १९७१ मध्ये झालेल्या युद्धात मिग-२१ विमानांची भूमिका खूप माेलाची हाेती. nत्यानंतर १९९९ मध्ये कारगिल युद्धात या विमानांसह मिग-२७ विमानांनी पुन्हा पाकिस्तानी सैन्याची व दहशतवाद्यांची दाणादाण उडविली हाेती.

विमाने ‘उडते ताबूत’ नावाने कुख्यातसंरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या ६० वर्षांमध्ये ४०० हून अधिक मिग-२१ विमाने अपघातग्रस्त झाली. त्यात १७० हून अधिक वैमानिक शहीद झाले आहेत. माेठ्या प्रमाणावर वैमानिकांचा मृत्यू झाल्यामुळे या विमानांना ‘उडते ताबूत’ म्हटले जाते.

१९६३ पासून भारतीय हवाई क्षेत्राची सुरक्षामिग विमानांना १९६३ मध्ये भारतीय हवाई दलामध्ये समाविष्ट करण्यात आले हाेते. चीनकडून १९६२ च्या युद्धात पराभव झाल्यानंतर भारताने मिग-२१ विमाने खरेदी केली हाेती. गेल्या ६० वर्षांपासून भारताचे हवाई क्षेत्र मजबूत करण्यात या विमानांची फार माेठी भूमिका राहिली आहे. ‘मिकाेयन-गुरेविच २१’ असे या विमानांचे नाव असून साेव्हिएत रशियाने ते बनविले हाेते. १६ जून १९५५ राेजी हे विमान सर्वप्रथम आकाशात झेपावले हाेते. तेव्हा या विमानाला एकच इंजिन हाेते. २००६ मध्ये विमानांचे अपग्रेडेशन करण्यात आले. 

टॅग्स :airforceहवाईदलPakistanपाकिस्तानDefenceसंरक्षण विभाग