शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 07:14 IST

Pakistani terrorists enter Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कठुआ-पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते जम्मू-पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

- सुरेश एस. डुग्गरजम्मू  - जम्मू-काश्मीरमधील कठुआ-पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते जम्मू-पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पाकिस्तानी ड्रोनची भारताच्या सरहद्दीत घुसखोरी वाढली आहे. त्या कारवायांकडे भारतीय सुरक्षा दलांचे लक्ष वळवून दुसऱ्या बाजूला संधी मिळताच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करायची, असा पाकिस्तानच्या लष्कराचा डाव असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सूत्रांनी सांगितले. दहशतवादी सीमेपलीकडून काश्मीरमध्ये घुसखोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठीही आणखी जवान तैनात केले जाणार आहेत.

गोळीबारात गावकरी जखमीसैदा सुखल या गावात दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका गावकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पाकिस्तानशी चर्चा करणे आवश्यक :  फारूक अब्दुल्लापाकिस्तानबरोबर चर्चा केल्याशिवाय काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले. जम्मूमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिक मरण पावत आहेत.  

दहशतवाद्यांनी मागितले पाणी अन्...- कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल या गावामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजता दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केला व त्यांनी तेथील गावकऱ्यांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. या दहशतवाद्यांना पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा दलाशी संपर्क साधला. - गावात दहशतवादी शिरले आहेत, ही माहिती मिळताच तिथे सुरक्षा दलाचे जवान तातडीने रवाना झाले. त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अभिनंदनाच्या संदेशांना उत्तर देण्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधानांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. येथे गेल्या ३ दिवसांत ३ वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत. भाजप सरकार असताना दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही?, याचे देश उत्तर मागत आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

दहशतवादी कारवाया करून जम्मू-काश्मीरचे प्रचंड नुकसान करणाऱ्या पाकिस्तानशी का चर्चा करायची? पाकिस्तानला जी भाषा कळते, त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला हवे.- रवींद्र राणा,  जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी