शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 10:25 IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. गुप्तहेर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानस्थित दहशतवादीभारतीय जवानांना पुलवामा येथे लक्ष्य करण्याच्या तयारीत असून, यावेळच्या हल्ल्यासाठी आयईडी आणि स्नायपरचा वापर होण्याची शक्यता आहे.  गुप्तहेर खात्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी दहशतवादी पुन्ह एकदा पुलवामामध्ये लष्कराला लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानी दहशतवादी राष्ट्रीय महामार्गावर स्नायपर गनद्वारे सुरक्षा दलांवर हल्ला करू शकतात. याशिवाय आयईडीचा स्फोट घडवून लष्कराला धोका पोहोचवण्यात येण्याचा धोका आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ते 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारस्थानाचा छडा सुरक्षा दलांनी लावला आहे. दहशतवाद्यांच्या या टोळीमध्ये एका स्नायपर एक्सपर्ट्सचाही समावेश आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये लपून राहण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपली नावेसुद्धा बदलली आहेत. कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणीच्या तिसऱ्या मृत्युदिनी त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची योजना आहे.  लष्कराने 8 जुलै 2-016 रोजी कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणीला ठार केले होते. दरम्यान, गोपनीय माहितीनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षीच 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान