शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: 2024 मध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60 टक्के पाकिस्तानी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:47 IST

Pakistani Terrorist Killed in J&K: वर्षभरात भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे.

Pakistani Terrorist Killed in J&K: भीकेला लागलेला पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात दहशतवादी कट रहच राहतो. भारतीय सैन्यदेखील प्रत्येकवेळी पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडते. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.

एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानचे टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त केले आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी गटांमध्ये स्थानिकांची भरतीही खूपच कमी झाली आहे. या वर्षी केवळ चार स्थानिक लोक या गटांमध्ये सामील झाले आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार, हे दलाच्या व्हाईट नाइट कॉर्प्सच्या देखरेखीखाली दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर भर देत आहेत.

75 दहशतवादी मारले

लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विविध चकमक आणि ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना जम्मू प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यासह राज्यातील विविध भागात सुमारे 75 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. याशिवाय नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या गोळीबारातही लष्कराने दहशतवाद्यांना पकडले आहे. जगभरात, विशेषत: भारताला दहशतवाद्यांची निर्यात करण्याचे सर्वात मोठे केंद्र म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते.

दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यात यशइस्लामाबादने गेल्या वर्षभरापासून जम्मू भागात दहशतवादाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जम्मू प्रदेशातील राजौरी, पुंछ, डोडा, किश्तवार, कठुआ आणि रियासी जिल्ह्यांसह पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवला जात आहे. त्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात केले जात असून, चीन सीमेवर तैनातीसाठी राष्ट्रीय रायफल्सचे एकसमान सैन्य मागे घेतल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढली जात आहे.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान