शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:43 IST

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा परिसरात सोमवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्करानं लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार (LeT top commander Nadeem Abrar)  याचा खात्मा केला आहे. त्याच्यासोबत आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. दरम्यान चकमकीत सीआरपीएफचा एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले आहेत. नदीम अबरार हा श्रीनगरच्या बारामुल्ला परिसरातील अनेक हत्याकांड आणि दहशतवादी कारवायांचा मास्टरमाईंड होता. (Pakistani terrorist and top commander lashkar e taiba abrar killed in srinagar encounter)

जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हायवेवर दहशतवादी हल्ला करण्यासंदर्भात लष्कराला माहिती मिळाली होती. याचीच माहिती घेत हायवेजवळ जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) पथक चेकपोस्टवर तैनात करण्यात आले होते. परिमपोरा नाक्यावर एक वाहन थांबवून चौकशी केली असताना मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं बॅग उघडून हँड ग्रेनेड काढला. त्यानंतर तातडीनं सुरक्षा दलानं प्रत्युत्तर देत त्याला पकडलं. वाहनातील तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला होता. मास्क काढल्यानंतर लक्षात आलं की तिघांपैकी एक जण लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबाबर होता. जेकेपी, सीआरपीएफ आणि लष्कराकडून तिघांची कसून चौकशी झाली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि पिस्तल हस्तगत करण्यात आले. कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी राहत्या घरात मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रास्त्र ठेवलेली असल्याचं समजलं. त्यानुसार तिघांना त्यांच्या घरी नेण्यात आलं होतं. 

घरी पोहोचताच सुरू झाली चकमकमलूरास्थित एका संदिग्ध घराजवळ पोहोचताच दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. घरात शिरताच अबरारच्या एका साथीदारानं सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. प्रत्युत्तर भारतीय जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत तिनही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. घटनास्थळावरुन एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात सध्या शोध मोहिम सुरू असल्याचंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा