शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
4
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
5
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
6
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
7
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
8
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
9
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
10
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
11
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
12
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
13
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
14
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
15
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
16
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
17
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
18
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
19
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
20
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पक्ष्याला स्थानिक पक्ष्यांनी मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 13:34 IST

देशाच्या शत्रुची ओळख पक्ष्यांनाही पटविता येते का? बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे.

वैशाली : देशाच्या शत्रुची ओळख पक्ष्यांनाही पटविता येते का? बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक खळबऴजनक घटना घडली आहे. एका पक्ष्याला काही पक्ष्यांनी चोचीने घायाळ केले आणि त्याचा जीव घेतला. यानंतर या पक्ष्याच्या खऱ्या रुपाचा उलगडा झाला. या पक्ष्याच्या पंखांखाली एक हेरगिरी करणारे य़ंत्र लावण्यात आले होते. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. असे पक्षी राजस्थानमध्ये सापडतात आणि पाकिस्तान त्यांना पाठवत असते.  

वैशालीच्या महनार ठाण्याच्या हसनपूर गावाच्या बाहेर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नवखा पक्षी आकाशात उडताना पाहून तेथील स्थानिक पक्ष्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला चोचीने बोचकारून घायाळ करण्यात आले. यामध्ये त्याचा जीव गेला. मात्र, य़ा पक्ष्यावर लावलेले यंत्र पाहून गावकऱ्यांना वेगळाच संशय आला. हेरगिरी करण्यासाठी हा पक्षी पाकिस्तानने सोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पक्षी पोलिसांना ताब्यात घेऊन वनविभागाला पोहोचविला आहे. 

पक्ष्यांची लढाई पाहण्यासाठी गर्दीआकाशात चाललेली पक्ष्यांची लढाई पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली. जवळपास अर्धा तास ही झुंज सुरु होती. शेवटी हा पक्षी एकटा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. जेव्हा ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले तेव्हा त्या पक्ष्याच्या शरीरावर यंत्र लावलेले दिसले, तसेच पायामध्ये पितळेचा टॅगही होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे यंत्र लावलेले पक्षी पाकिस्तानातून हेरगिरीसाठी येतात. आंतरराष्ट्रीय सीमेवरील राजस्थानच्या जैसलमेरसारख्या जिल्ह्यांमध्ये ते दिसतात. 

हा पक्षी बिहारमध्ये कसा? पाकिस्तानी सीमेवर हेरगिरी करणे ठीक आहे. मात्र, हा पक्षी एवढ्या आतमध्ये बिहारमध्ये काय करत होता? आयएसआयच्या कोणत्या योजनेसाठी हा काम करत होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत