शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

22 वर्षांपासून मोदींना राखी बांधते 'ही' पाकिस्तानी महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 10:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण त्यांना रक्षा बंधनानिमित्त आज राखी बांधणार आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण त्यांना रक्षा बंधनानिमित्त आज राखी बांधणार आहे. कमर मोहसिन शेख असं या महिलेचं नाव असून गेल्या 22-23 वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधत आहेत. यंदाही राखी बांधण्यासाठी उत्सुक असल्याचं कमर मोहसिन शेख यांनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 7- भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असला तरी या दोन्ही देशातील नात्यांचा वेगळा पैलु दाखविणारी ही बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण त्यांना रक्षा बंधनानिमित्त आज राखी बांधणार आहे. कमर मोहसिन शेख असं या महिलेचं नाव असून गेल्या 22-23 वर्षांपासून त्या मोदींना राखी बांधत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

मी गेल्या 22-23 वर्षापासून नरेंद्र मोदी यांना राखी बांधते आहे. यंदाही राखी बांधण्यासाठी उत्सुक असल्याचं कमर मोहसिन शेख यांनी सांगितलं आहे. लग्नानंतर कमर मोहसिन शेख या भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्या इथल्याच नागरीक आहेत. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असताना कमर मोहसिन शेख यांनी मोदींना पहिल्यांदा राखी बांधली होती. 

नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने ते कामात व्यस्त असतील त्यामुळे कमल शेख यंदा मोदींना राखी बांधणार नव्हत्या. पण काही दिवसापूर्वी मोदींनी त्यांना स्वत: फोन करून रक्षाबंधनाची आठवण करून दिली, असं त्यांनी सांगितलं. मोदींनी मला स्वतःहून फोन केल्याने मला अतिशय आनंद झाला आणि लगेचच रक्षा बंधनाच्या तयारीला लागल्याचं कमर मोहसिने शेख यांनी सांगितलं आहे. 

कमर मोहसिन शेख यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे पण त्या लग्नानंतर भारतात स्थायिक झाल्या आहेत. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यापासून कमर शेख मोदींना राखी बांधतात. मोदी कठोर मेहनती आणि दुरदर्शी असल्यानेच ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचल्याचं कमर मोहसिन शेख म्हणाल्या आहेत.

वाराणसीच्या वृद्धाश्रमातील महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी बनवल्या राख्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत.  या आश्रमात राहणा-या महिला पंतप्रधानांना आपल्या भावासमान  मानतात. पंतप्रधान स्वतः रक्षाबंधनादिवशी आश्रमात येऊ शकत नाहीत. मात्र आपण आपल्या हाताने बनवलेल्या राख्या तरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकते,अशी भावना व्यक्त करत या महिलांनी पंतप्रधान मोदींना राख्या पाठवल्या आहेत. राख्या बनवलेल्यांपैकी एक असलेल्या मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं की, रक्षाबंधन सणासाठी प्रत्येक बहिणीच्या मनात उत्साह-आनंद असतो. या आश्रमातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला भाऊ मानतात. यासाठी सर्व महिलांनी स्वतःच्या हाताने मोदींसाठी राखी बनवून पाठवल्या आहेत. तर दुसरीकडे वाराणसीतील मुस्लिम महिलांनीदेखील स्वतः हाताने पंतप्रधान मोदींसाठी राख्या बनवल्या आहेत.