शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या निर्णयावर पाक वृत्तपत्रांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:20 IST

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले असून, तेथील सर्वच वृत्तपत्रांनी या निमित्ताने मंगळवारी भारतावर टीका केली आहे. भारताने जबरदस्तीने आणि हुकूमशाही काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि एक विशिष्ट समाज नष्ट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे, असे काही वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.‘डॉन’ या मोठ्या खपाच्या प्रमुख दैनिकाने भारत सरकार हिंदुत्तवादी विचारांचे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी काश्मीरबाबतची ३७0 व ३५ अ ही कलमे हटवण्यात आल्याची टीकाही त्यात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयांना काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आहे, असे नमूद करताना डाव्या पक्षांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला डॉनने प्रसिद्धी दिली आहे.इस्राएलने ज्या प्रकारे एक विशिष्ट समुदाय देशातून संपविण्याचे कारस्थान आखले होते, तसेच भारत सरकारने काश्मीरबाबत चालविले असल्याची टीका ‘द नेशन’ वृत्तपत्राने केली आहे. काश्मीरचा जगाशी असलेला संपर्क तोडण्याचे प्रयत्न भारत सरकार करू पाहत असून, नियंत्रण रेषेवर प्रचंड तणाव निर्माण करण्याचा आणि त्यात पाकिस्तानला अडकावण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.भारत सरकारने हा निर्णय घेताना काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांना डांबून ठेवले, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लष्कर व सशस्त्र दले आणून संचारबंदीसदृश्य वातावरण निर्माण केले, लोकांत भीती निर्माण केली, असे द न्यूज या वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे. भारताचा हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या धोरणाविरुद्ध असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. भारतात सध्या अतिटोकाचे सरकार असून, त्याचे इरादे काय आहेत, हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया बिलावल भूट्टो यांनी व्यक्त केली आहे.द पॅट्रियट या वृत्तपत्राने महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा भारत आता मरण पावला असून, भविष्यात भारतात दडपशाहीनेच सारे निर्णय घेतले जातील, असे म्हटले आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370