शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा पाकिस्तानचे लष्करी अधिकारी माझ्याशी फोनवर बोलायलाही घाबरत होते- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 06:37 IST

या हल्ल्यामुळे आता भारताकडूनही आपल्याला जशास तसे प्रत्युत्तर मिळणार, याची जाणीव पाकिस्तानला झाली.

लंडन: भारताकडून 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी माझ्याशी फोनवर बोलायलाही घाबरत होते, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते बुधवारी लंडनच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्यावेळचा एक प्रसंग उपस्थितांसमोर कथन केला.  सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानलाही याबद्दल कळवले होते. जेणेकरून या हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या सैनिकांचे मृतदेह त्यांना परत नेता यावेत. त्यासाठी आम्ही सकाळी 11 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये फोन केला. मात्र, तेव्हा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह सर्वच अधिकारी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे कोणीही माझ्याशी फोनवर बोलायला तयार नव्हते. अखेर दुपारी 12 च्या सुमारास आम्ही त्यांच्याशी बोललो व त्यानंतर ही माहिती सार्वजनिक केली, असे मोदींनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या हल्ल्यामुळे आता भारताकडूनही आपल्याला जशास तसे प्रत्युत्तर मिळणार, याची जाणीव पाकिस्तानला झाली. इतकी वर्षे दहशतवाद पसरवणाऱ्यांना मला हेच सांगायचे होते की, भारत बदलला आहे आणि त्यांची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईकच्यानिमित्ताने आम्ही त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले, असे मोदींनी म्हटले. 

प्रसिद्ध कवी प्रसून जोशी यांनी मोदींची मुलाखत घेतली. यावेळी मोदींना कठुआ आणि उन्नावमधील सामूहिक बलात्काराच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मोदींनी म्हटले की, अशाप्रकारच्या बलात्काराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. देशासाठी हा कलंक आहे. ही विकृती कदापि सहन केली जाऊ शकत नाही. परंतु, बलात्काराच्या घटनांचे राजकारण होता कामा नये, असे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक