चंदीगड : बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले.पठाणकोट ते फाजिल्का जिल्ह्यात अशा हालचाली दिसून आल्या आहेत. सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन रात्रीच्या वेळीच कार्यरत होतात. आपले सैनिक या ड्रोनचा आवाज ऐकतात. रात्रीच्या वेळी या छोट्या ड्रोनला मारणे शक्य नाही. ज्या भागात संरक्षण करणाऱ्या गन उपलब्ध आहेत त्याठिकाणी या ड्रोनला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले.पोलिसांनी सांगितले होते की, शस्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोनचा उपयोग केला जातो. पोलिसांनी असेही सांगितले की, जीपीएसने सुसज्ज असलेले ड्रोन १० किलो वजन उचलण्याच्या क्षमतेचे आहेत. सप्टेंबरमध्ये असे सात ते आठ प्रयत्न करण्यात आले आणि पिस्तूल, हँड ग्रेडेड जप्त करण्यात आले होते.‘पाक कधीही काळ्या यादीत दिसू शकतो’नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याबद्दल पाकिस्तानला कधीही फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) काळ्या यादीत टाकू शकते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी येथे म्हटले.भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्या गटांना मिळणारा पैसा रोखण्यात अपयश आल्याबद्दल गेल्या आॅगस्ट महिन्यात एफएटीएफच्या आशिया पॅसिफिक ग्रुपने पाकिस्तानला दहशतवादाबद्दल काळ्या यादीत टाकले होते. संरक्षण लेखा विभाग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, एफएटीएफ पाकिस्तानला दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याबद्दल कधीही काळ्या यादीत घालू शकते.इम्रान खान हे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला जाण्यासाठी विमानाची व्यवस्था करू शकले नाहीत,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
पंजाब सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:42 IST