शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसर हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, ग्रेनेड फेकणाऱ्या स्थानिक तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 17:11 IST

अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देअमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी  एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली आहेपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा माहितीस दुजोरा दिला आहे

अमृतसर - अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी  एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीवेळी त्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा माहितीस दुजोरा दिला आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंह हॅपी उर्फ पीएचडी याचा हात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या हॅपी उर्फ पीएचडीने स्थानिक तरुणांच्या मदतीना हा ग्रेनेड हल्ला घडवून आणला होता. दरम्यान, या हल्ल्यामागे कुठलाही सांप्रदायिक अॅंगल नसल्याचे अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

रविवारी अमृतसरमधील राजासांसी येथील  निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. तसेच सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या होत्या. अखेरीस या हल्ल्याच्या तपासादरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही आरोपी तरुणांची ओळख पटवून त्यापैकी एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बिक्रमजीत सिंह असून, तो धालीवाल गावातील रहिवासी आहे. अन्य आरोपीचे नाव अवतार सिंह असून, त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. दहशतवादी आता काश्मीरमधून पंजाबच्या दिशेने पावले वळवत आहेत. मात्र आम्ही त्यांना रोखू, असेही अमरिंदर सिंग  यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Blastस्फोटPunjabपंजाब