शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी मौलवीने केली सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 16:40 IST

'मला किती वेळा विकलं, हेदेखील आता मला आठवत नाही'

ठळक मुद्देअपहरण, ब्लॅकमेल आणि तस्करीमध्ये अडकलेल्या सबीनाच्या गोष्टीवरुन अनेक देशांमध्ये सुरु असलेलं सेक्स रॅकेट समोर आलं आहेपहिल्या पतीची नातेवाईक चांगलं काम आणि पैसे मिळवून देण्याचं अमिष दाखवत मलेशियामधील क्वालालंपूर येथे घेऊन आलीपाकिस्तानी मौलवीने मदत केली, तेव्हा कुठे सबिनाची या भयाण परिस्थितीतून सुटका झाली

नवी दिल्ली, दि. 15 - जेव्हा सबीना (बदललेलं नाव) 7 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या तेव्हा सर्वात आधी आपल्या मुलाला मिठी मारुन अश्रूंना मार्ग मोकळा करुन दिला. सबीना यांच्या भावनिक होण्यामागची कहाणीही तितकीच भयानक आहे. अपहरण, ब्लॅकमेल आणि तस्करीमध्ये अडकलेल्या सबीनाच्या गोष्टीवरुन अनेक देशांमध्ये सुरु असलेलं सेक्स रॅकेट समोर आलं आहे. 

मे महिन्यामध्ये सबीनाचा हा भयानक प्रवास सुरु झाला, जेव्हा तिच्या पहिल्या पतीची नातेवाईक मुन्नी चांगलं काम आणि पैसे मिळवून देण्याचं अमिष दाखवत मलेशियामधील क्वालालंपूर येथे घेऊन आली. मुन्नीने तिथे पोहोचल्यानंतर सबीनाला एका गृहस्थाला विकले. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या मित्रासोबत मिळून सबीनावर बलात्कार केला. एका पाकिस्तानी मौलवीने मदत केली, तेव्हा कुठे सबिनाची या भयाण परिस्थितीतून सुटका झाली. सबीना जेव्हा मलेशियाला चालली होती, तेव्हा मुन्नी आणि दोन महिला तिच्यासोबत होत्या. मुन्नीची बहिण मोहम्मदीदेखील तिच्यासोबत होती.

मलेशियामध्ये अडकलेल्या सबीनाच्या मदतीसाठी पाकिस्तानी नागरिक देवाप्रमाणे धावून आला. त्याने सबीनाचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं, आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी छापेमारी करत मुन्नी आणि मोहम्मदी दोघींना अटक केली आहे. 

सबीनाची सुटका केल्यानंतर मिशनरीद्वारा चालवत येत असलेल्या एका निवा-यात तिला ठेवण्यात आलं. मात्र आपला मुलगा आणि पतीपासून लांब असल्याने तिला होणारा त्रास पाहून तेथील मुलांनी दिल्लीमधील मिशनरीसोबत संपर्क साधला. यानंतर शेवटी तिला भारतात आणण्यात आलं. 

मुन्नीसोबत मलेशियाला का गेली ? असं विचारलं असता सबीनाने सांगितलं की, 'ती मला नेहमी माझे खासगी फोटो दाखवून चुकीची कामं करण्यास प्रवृत्त करत असे. एका पाकिस्तानी मौलवीसोबत माझी भेट झाली. त्यांनी माझी पुर्ण गोष्ट ऐकली, आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. जर त्यांनी मदत केली नसती, तर आज मी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत असते'. 'मला किती वेळा विकलं हेदेखील मला आठवत नाही', असं सबीना बोलल्या आहेत.