शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:03 IST

Pakistani Aircraft : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले.  त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढतच गेला. यावेळी भारताने पाकिस्तानीविमानांना भारतीय हद्दीत प्रवेश दिला नव्हता. आता याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली.  

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी एका पोस्टमध्ये हवाई हद्दीवरील निर्बंधांची माहिती पोस्ट केली. "पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालणारी नोटीस टू एअरमेन अधिकृतपणे २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ विद्यमान सुरक्षा प्रोटोकॉलनुसार आहे",अशी माहिती त्यांनी दिली.

या निर्णयाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स नंतर शेअर केले जातील. पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई हद्दीतून बंदी घालण्याच्या पूर्वीच्या निर्णयानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

२४ ऑगस्टपर्यंत बंदी

बंदी एका महिन्यासाठी म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात सांगितले की, पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या विमानांसाठी त्यांचे हवाई हद्द बंद करण्याचा कालावधी एका महिन्यासाठी म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.

ही बंदी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ५.१९  पर्यंत लागू राहील, असे पीएएने म्हटले आहे. दरम्यान, २३-२५ जुलै रोजी भारत-पाकिस्तान सीमेवर राजस्थानमध्ये होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सरावासाठी NOTAM जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानairplaneविमान