शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 15:50 IST

"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल."

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरातील जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत आहे. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा मिळविण्यासंदर्भात संकेत देत, जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.

‘शौर्य दिवस’ कार्यक्रमाला गुरुवारी संबोधित करताना राजनाथ म्हणाले, ‘आपण जम्मू काश्मीर आणि लद्दाखमध्ये विकासाच्या यात्रेला नुकतीच सुरुवात केली आहे. आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल.’ भारतीय हवाई दलाचे जवान 1947 मध्ये आजच्याच दिवशी श्रीनगरमध्ये पोहोचले होते. या घटनेच्या आठवणीनिमित्त ‘शौर्य दिवसा’चे आयोजन केले जाते.

‘दहशतवादाचा धर्म नाही’ -पाकिस्तानकडून पीओकेमधील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करत राजनाथ म्हणाले, शेजारील देशाला ‘‘याचे परिणाम भोगावे लागतील’’. तसेच, ‘दहशतवाद्याला कुठलाही धर्म नसतो. केवळ भारताला निशाणा बनवणे, हाच दहशतवाद्यांचा एकमेव हेतू आहे, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहairforceहवाईदलPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके