शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

पाकिस्तानची भारताला धमकी, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर याद राखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:18 IST

जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे.

ठळक मुद्देकाश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे.

श्रीनगर - जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करेल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे. सुंजवां लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप भारतीय तपास यंत्रणांनी केला आहे. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावताना भारताने तपासाशिवाय निष्कर्ष काढल्याचे म्हटले आहे. 

शनिवारी पहाटे जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले. एका सैनिकाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दहा जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे कि, हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे. भारतीय अधिकारी बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप करत आहेत. 

काश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. त्यावरुन लक्ष वळवण्यासाठी भारत असे आरोप करत आहे. भारताने नियंत्रण रेषा पार करुन काही आगळीक केली,  तर खपवून घेणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सुमदाय भारताला काश्मीरमध्ये मानवधिकाराचे उल्लंघन करण्यापासून रोखेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.  

इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीदजम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर, तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण, श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालंय. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक