शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच, गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:17 IST

सीमारेषेवर  पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. 

जम्मू-काश्मीर : सीमारेषेवर  पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सुंदरबन येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी सीमारेषेवर तैनात असलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे लान्स नायक सॅम अब्राहम हे शहीद झाले आहेत. दरम्यान, जम्मूमधील आर.एस.पुरा सेक्टर, अर्निया व रामगड सेक्टर परिसरात सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात शुक्रवारी येथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत. याशिवाय, गुरुवारीदेखील (18  जानेवारी) आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून  30 -40 भारतीय चौक्यांना टार्गेट करण्यात येत आहे. शिवाय, पाकिस्तानी रेंजर्स भारतीय नागरिकांना निशाणा बनवत आहेत.  

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार पोलीस जखमीपुलवामामधील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्लात चार पोलीस कर्मचारी जमखी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांची दुसरी तुकडी दाखल झाली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. तसेच, जखमी पोलीस कर्मचा-यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

 

 

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर