लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेला पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ने सर्व सरकारी, आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना त्यांची सायबर सुरक्षा मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान-समर्थित हॅकर गट, जसे की पाकिस्तान सायबर फोर्स आणि एपीटी ३६ हे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे मालवेअर पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. या बनावट लिंक्स आणि व्हायरस बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरू शकतात. त्यामुळे सावध रहा.
माहिती चोरण्यासाठी हॅकर्स नेमके काय करतात?
फिशिंगद्वारे सरकारी सूचना किंवा व्हिडीओ म्हणून दिसणारे आकर्षक संदेश हॅकर्स पाठवतात. तुम्ही यावर क्लिक करताच, मालवेअर सिस्टममध्ये प्रवेश करतो आणि तुमचा डेटा चोरू शकतो.
नेमके काय कराल ?
अज्ञात लिंक्स आणि फाइल्स कधीही उघडू नका.
२ फॅक्टर अॅथॉटिकेशन नेहमी चालू ठेवा.
तुमचे पासवर्ड सुरक्षित आणि मजबूत ठेवा.
मॉल्स किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय वापरणे टाळा.
डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणे आवश्यक आहे.
आधार, पॅन क्रमांकसह वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तीस शेअर करू नका.
अशा फाइल्सवर क्लिक करू नका
taskscheme.exeoperationSindoor.pptDanceofHilary.exeIndianArmyReport.pptInsidesofWar.exeoperationsin Sindu.pptx