शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:54 IST

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच 26/11 या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांची हत्या करणारे खुलेआम फिरत आहेत. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची गरज आहे.26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये मोकळा फिरत आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसून ठरवण्यात आली आणि तिकडूनच हल्लेखोरांना भारतात पाठवण्यात आलं. आम्ही पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा अपील करतो की, दुटप्पी भूमिका सोडून त्यांनी त्या हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंही परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक जण जखमी होते. दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला जिवंत पकडलं होतं आणि 21 नोव्हेंबर 2012ला त्याला फासावर चढवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजस्थानमधल्या भिलवाडामधल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. आम्ही संधीच्या शोधात आहोत. 26/11चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अशी कारवाई केली आहे की, त्यांना काश्मीरमधून बाहेर पडताही येत नाही आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी