शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा अमानवी चेहरा पुन्हा उघड; भारतीय असल्यानं तडफडणाऱ्या प्रवाशाला नाकारली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 21:06 IST

वैद्यकीय मदतीसाठी विमानाचं लाहोरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं

लाहोर: पाकिस्तानचा अमानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं स्वातंत्र्य दिनालाच असंवेदनशीलचा कळस गाठला आहे. भारतातून तुर्कस्तानला जात असलेल्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यानं वैमानिकानं लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं. मात्र या प्रवाशाला वैद्यकीय मदत पुरवण्यास पाकिस्ताननं नकार दिला. वैद्यकीय उपचारांची गरज असलेली भारतीय असल्यानं मदत करणं शक्य नसल्याचं कारण पाकिस्तानकडून देण्यात आलं. राजस्थानच्या भिवाडी शहरातील विपिन तुर्कस्तानला जात असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे वैमानिकानं लाहोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं. यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय मदत मागण्यात आली. मात्र विपिन भारतीय असल्यानं त्याला वैद्यकीय मदत पुरवता येणार नाही, असं विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. सध्या विपिनवर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 ऑगस्टला (काल) हा संपूर्ण प्रकार घडला. विपिन प्रवास करत असलेलं विमान लाहोर विमानतळावर उतरल्यावर जवळपास 3 तास तो तडफडत होता. मात्र विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मदत दिली नाही. त्यामुळे तुर्की एअरलाईन्सच्या वैमानिकानं विमान पुन्हा भारताच्या दिशेनं वळवलं. यानंतर विमानानं दिल्ली विमानतळावर लँडिग केलं आणि विपिनला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विपिनची प्रकृती अजूनही गंभीर आहे. विपिनसोबत प्रवास करत असलेल्या जालंधरच्या पंकज मेहता यांनी ट्विटच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAirportविमानतळ