शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:56 IST

भारतीय लष्कराचे जवान गुरप्रीत सिंह आणि साहिल मसीह यांना आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' ची माहिती भारतील लष्करातील गद्दार जवानांनी पाकिस्तानला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी या दोघांनी हेरगिरी केली. गुरप्रीत सिंह आणि त्याचा साथीदार साहिल मसीह या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांना मागील दोन महिन्यांत २ लाख रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली होती. ही रक्कम गुरप्रीतने त्याच्या साथीदार साहिलच्या बँक खात्यात जमा केली होती.

राणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान गुरप्रीतने अनेक लष्करी तळांची माहिती आयएसआयला पाठवल्याचेही उघड झाले आहे. दुसरीकडे, न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे आणि त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. एसएसपी मनिंदर सिंग म्हणाले की, जम्मू व्यतिरिक्त गुरप्रीत सिंहने दिल्ली कॅन्ट आणि मेरठ कॅन्टमध्येही आपले कर्तव्य बजावले आहे.

तो जवान बऱ्याच काळापासून आयएसआय एजंट राणा जावेदच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने राणा जावेदच्या माध्यमातून जम्मू तसेच दिल्ली, मेरठ आणि पंजाबमधील अनेक लष्करी तळांची माहिती आयएसआयला पुरवली आहे.

आरोपीचे वडील गुरुद्वारा साहिबमध्ये सेवादार 

धालीवाल येथील रहिवासी गुरप्रीतचा राणा जावेदशी अर्जन नावाच्या गावातील ड्रग्ज तस्कराने संपर्क साधला होता. तो सध्या दुबईमध्ये राहतो. पोलिसांनी सांगितले की, अर्जनला लवकरच एलओसी जारी केला जाईल. अटक केलेल्या गुरप्रीत सिंगचे वडील गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये सेवादार आहेत. दोन्ही आरोपी फतेहपूर तुरुंगात आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून इतर सुरक्षा संस्थांनीही अमृतसरमध्ये तळ ठोकला आहे. सोमवारी संध्याकाळी गुरप्रीत आणि साहिल यांची जेआयसी येथे चौकशी करण्यात आली. हेरगिरीचे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीचे नाही तर ते एका मोठ्या नेटवर्कचा भाग असू शकते अशी शंका यंत्रणांना आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान