शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:35 IST

लोकांनी ट्विटर आणि अन्य माध्यमांद्वारे इम्रान सरकारला ट्रोल केल्यानंतर पाकिस्तानच्या सरकारनं लागलीच दखल घेत दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

इस्लामाबादः पाकव्याप्त काश्मीरवरून भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. भारतानं पाकिस्तानला हा भाग लवकरात लवकर रिकामी करण्यास सांगितलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही चॅनल असलेल्या पीटीव्हीनेच इम्रान खान यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. पीटीव्हीनं पाकिस्तानची लोकसंख्या दाखवताना संपूर्ण काश्मीर भारताचा भाग असल्याचं दाखवलं आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकांनी ट्विटर आणि अन्य माध्यमांद्वारे इम्रान सरकारला ट्रोल केल्यानंतर पाकिस्तानच्या सरकारनं लागलीच दखल घेत दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही चॅनल पीटीव्हीने इम्रान खानच्या अडचणी वाढवल्या आहेत. अलीकडेच पीटीव्हीने पाकिस्तानची लोकसंख्या सांगताना संपूर्ण काश्मीर भारताचा भाग म्हणून दाखविला. नंतर लोकांनी ट्विटर व अन्य माध्यमांवर पीटीव्हीच्या वृत्तावरून इम्रान सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता पीटीव्हीने स्पष्टीकरण दिले आहे की, ही मानवी चूक होती आणि दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. पीटीव्हीने निवेदन जारी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे, पीटीव्ही व्यवस्थापनाने मानवी चुकांमुळे पाकिस्तानचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. त्यासंदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासनही पीटीव्हीच्या एमडीने दिलं आहे. मात्र, पीटीव्हीच्या निवेदनापूर्वीच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली होती आणि लोकांनी या चुकीबद्दल इम्रान सरकारकडे जाब विचारण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी पीटीव्हीनेही पीएम इम्रान खानच्या चीन भेटीदरम्यान मोठी चूक केली होती. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये इम्रान खान भाषणाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान पडद्यावर 'बीजिंग' ऐवजी इंग्रजी शब्द 'बेगिंग' (भीक मागणे) लिहिले गेले. यासाठीसुद्धा त्याला माफी मागावी लागली आणि चीननेही यावर आक्षेप घेतला होता.पीओकेचा भाग भारतात दाखवल्यानं उडाली खळबळपाकिस्तानने पीओकेचा एक विवादित नकाशा प्रसिद्ध केला, जो कोरोना विषाणूसाठी बनविलेल्या वेबसाइटच्या माध्यमातून भारतात दिसत होता. पाकमधल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या त्वरित हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इम्रान सरकारला धारेवर धरलं. नकाशात पाकव्याप्त काश्मीरमधला भारताचा तो भाग दर्शविला आहे, ज्याचा दावा भारत आधीपासूनच करत आला आहे. पीटीव्हीच्या एमडीने या घटनेविषयी सांगितले की, त्यांची संस्था अशी चूक माफ करणार नाही. दोषींना वाचवले जाणार नाही.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके