शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पाकिस्तानातून आली फिटनेस चॅलेंजची लाट, क्रीडामंत्र्यांनी केली होती सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 18:18 IST

दोन वर्षांपूर्वी क्रीडामंत्र्यांनी दिलं होतं फिटनेस चॅलेंज

नवी दिल्ली: क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी क्रीडा क्षेत्रातील अनेकांना दिलेल्या फिटनेस चॅलेंजची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. राठोड यांनी पुश अप्स मारतानाचा व्हिडीओ ट्विट करत विराट कोहली, सायना नेहवाल, ऋतिक रोशन यांना फिटनेस चॅलेंज दिलं. यानंतर अनेकांनी व्यायाम करतानाचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या फिटनेस चॅलेंजचं मूळ पाकिस्तानात आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील सिंध प्रांताचे क्रीडा मंत्री मोहम्मद बक्स महर यांनी फिटनेस चॅलेंज दिलं होतं. 2016 च्या सुरुवातीला महर क्रीडा मंत्री असताना त्यांनी बाकीच्या मंत्र्यांना हे चॅलेंज दिलं होतं. महर यांनी फिटनेस चॅलेंजच्या व्हिडीओमध्ये 40 सेकंदांमध्ये 50 पुशअप्स मारले होते. इतर मंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तरुणांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावं, फिटनेस चॅलेंजमधून त्यांनी प्रेरणा घ्यावी, असा महर यांचा प्रयत्न होता. तसं आवाहनही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं. राठोड यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओतूनही हेच आवाहन केलं. मोहम्मद बक्स महर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांचे निकटवर्तीय मानले जातात.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानministerमंत्री