शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:36 IST

Pakistan India Tension: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.

Pakistan India Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीच्या छायेत पाकिस्तान आहे. दरम्यान, आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बुधवारी (30 एप्रिल 2025) गिलगिट आणि स्कार्दूला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. 

परदेशी उड्डाणांवर देखरेख वाढवलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर उत्तरेकडील भागांना जाणारी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, परदेशी उड्डाणांवरही कडक देखरेख सुरू करण्यात आली. माहितीनुसार, पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला (CAA) सर्व येणाऱ्या परदेशी विमानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंदपाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र आधीच बंद केले आहे. या संदर्भात एअरमेनला नोटीस जारी करण्यात आली, ज्यामध्ये सुरुवातीला एका महिन्यासाठी भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध भारतीय लष्करी आणि व्हीआयपी विमानांवर देखील लागू होतात.

दोन्ही देशातील तणाव शिगेला 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 

दोन्ही देशांची एकमेकांवर कारवाईभारताने पाकविरोधात कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये 1960 च्या सिंधू पाणी कराराचे तात्काळ निलंबन, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे अशा कारवायांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयांनंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे, असे निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत