शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेसंबंधी पाकिस्तानाने अद्यापपर्यंत नाही दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 08:20 IST

पाकिस्तानने फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण सासूबाईंना म्हणजे कुलभूषण यांच्या आईलाही परवानगी द्यावी अशी त्यांच्या पत्नीची इच्छा आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे.त्नीसोबत राजनैतिक अधिका-यालाही जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची त्यांच्या कुटुंबियांना परवानगी दिली आहे. पण कुटुंबियांच्या सुरक्षिततेसंबंधी अद्यापपर्यंत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षिततेची हमी मागितली आहे. भारताने यासंबंधी पाठवलेल्या पत्राला पाकिस्तानने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. 

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. पाकिस्तानने फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण सासूबाईंना म्हणजे कुलभूषण यांच्या आईलाही परवानगी द्यावी अशी त्यांच्या पत्नीची इच्छा आहे. पाकिस्तानचा इतिहास लक्षात भारत या भेटीआधी बरीच सतर्कता आणि काळजी घेत आहे. भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. 

पाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे तसेच तुरुंगात कुलभूषण यांना भेटण्याच्यावेळी पत्नीसोबत राजनैतिक अधिका-यालाही जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली आहे. मानवीय दृष्टीकोनातून कुलभूषण यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी देत आहोत असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. 

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या एससीओ देशांच्या परिषदेसाठी रशियात सोची येथे गेल्या आहेत. तिथे त्यांची पाकिस्तानी पंतप्रधान खाकन अब्बासी यांच्याशी भेट होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. खाकन अब्बासी सुद्धा या परिषदेसाठी रशियामध्ये आहेत. कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात बंद आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केल्यामुळे पाकिस्तानला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.   

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान