शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ

By admin | Updated: October 1, 2016 13:18 IST

'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ ते १७ तळ आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - जम्मू-काश्मीरमधील  'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ते १७ तळ सुरक्षित स्थळी हलवले होते, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.  ' भारताकडून जोरदार हल्ला होण्याची कुणकुण लागताच लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने 'लष्कर -ए-तोयबा', ' जैश -ए -मोहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दीन'चे दहशतवादी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. मनसेहरा व मुझफ्फराबाद येथून कार्यरत असलेले ४ दहशतवादी तळही हलवण्यात आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. 
(कमांडोनी चार तासात सात अतिरेकी तळ केले उद्ध्वस्त)
(भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?)
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
(उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल)
  •  
 १८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ रिकामे करत सुमारे ३०० दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांचे डझनभर तळ नौशेरा व झेलम या भागात तर काही तळ स्थानिक वस्तीत हलवण्यात आल्याचे समजते. 
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.