शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 07:22 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

मेंढर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाकिस्तान घाबरताे. त्यामुळेच जम्मू-काश्मीर सीमेवर शांतता आहे. भारत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देईल, हे जाणून असल्यामुळेच पाकिस्तान गाेळीबार करण्यास धजावणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी शाह यांनी मेंढर, थानामंडी, राजाैरी, पुंछ आणि अखनूर येथे प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीकास्त्र साेडताना सांगितले की, केंद्र सरकारने तरुणांच्या हातात बंदुका-दगडांऐवजी लॅपटाॅप देत दहशतवादाचा बिमाेड केला. सरकार जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये बंदुकांचा आवाज येऊ देणार नाही. लाेकांच्या सुरक्षेसाठी सीमेजवळ आणखी बंकर बनवू. मी १९९० च्या दशकात सीमेपलीकडून हाेणाऱ्या गाेळीबाराची आठवण करून देऊ इच्छिताे.

देशाला त्यांचा अभिमान...

शाह म्हणाले की, १९४७ मध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या गुज्जर आणि बक्करवाल समुदायावर देशाला अभिमान आहे. दहशतवाद फाेफावला त्यावेळी यांनीच शत्रूच्या गाेळ्या छातीवर झेलल्या. पहाडी, गुज्जर आणि बक्करवाल समुदायांना केवळ नाेकरीतच नव्हे तर पदाेन्नतीमध्येही आरक्षण देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे, असे शाह यावेळी म्हणाले.

‘फारुख यांनीच दहशतवाद आणला’

शाह यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांवर काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्यासाठी दाेषी ठरविले.

९० च्या दशकात फारुख यांच्याच आशीर्वादाने दहशतवाद फाेफावला. त्यावेळी प्रचंड गाेळीबार व्हायचा.

९० च्या दशकापासून २०१४ पर्यंत तिन्ही घराण्यांनी दहशतवाद पसरविला. त्यात ४० हजार तरुणांचा मृत्यू झाला, असा आराेप त्यांनी केला.

तोवर चर्चा नाहीच...

पूर्वीचे शासक पाकिस्तानला घाबरत हाेते. मात्र, आज पाकिस्तान माेदींना घाबरताे. ताे गाेळीबार करण्याची हिम्मत करणार नाही, असे शाह म्हणाले. दहशतवाद थांबविणार नाही, ताेपर्यंत पाकिस्तानसाेबत काेणतीही चर्चा हाेणार नाही, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान