शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:37 IST

भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत.

नवी दिल्ली-  भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत. भारतीय हवाई दलानंपाकिस्तानमधले दहशतवादी कॅम्प नष्ट केल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आतापर्यंत भारतानं पाकिस्तानच्या सर्वच नापाक योजना हाणून पाडल्या आहेत.सोमवारीही पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान पंजाब सीमेजवळ घिरट्या घालत असताना दिसलं. एएनआयच्या माहितीनुसार, पंजाब सीमेजवळ भारतीय रडारनं चार पाकिस्तानी एफ 16 विमानं आणि एक मोठ्या आकाराच्या यूएव्हीला पकडलं. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतलं. भारतीय लढाऊ विमानं येत असल्याचं पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं पाकच्या हद्दीत परतली. ही घटना एक एप्रिलला पहाटे 3 वाजता घडली.  पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. 26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी पाकिस्ताननं एफ 16 आणि जेएफ 17 ही लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानानं पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला खाली पाडलं. त्यानंतर मिग 21 विमानही दुर्घटनाग्रस्त झालं. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमानलाही पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु भारतानं दबाव वाढल्यानंतर त्याला पाकिस्ताननं सोडलं होतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल