शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नापाक ड्रोन बीएसएफ जवानांनी पाडले; ६ किलो नार्कोटिक्सचा साठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 08:40 IST

ड्रोनने नार्कोटिक्सच्या दोन बॅगा वाहून आणल्या होत्या. अमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे.

जयपूर : राजस्थानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर अमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. ड्रोनने वाहून आणलेला ६ किलो नार्कोटिक्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ड्रोनने नार्कोटिक्सच्या दोन बॅगा वाहून आणल्या होत्या. अमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्यातील काही ड्रोन विमाने बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता राजस्थानच्या सीमेवरदेखील पाकिस्तानी ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत.  हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अमली पदार्थांसाेबत स्फाेटकेही पाठविण्यात येतात. राजस्थान, गुजरात, पंजाब, काश्मीर येथून सीमा ओलांडून अमली पदार्थांची  भारतात तस्करी करण्याचे अनेकदा झालेले प्रयत्न लष्कराने हाणून पाडले. 

पंजाबमध्ये शुक्रवारी ५ किलो अमली पदार्थ घेऊन आलेले पाकिस्तानी ड्रोन बीएसएफ जवानांनी गोळीबार करून पाडले होते. त्यानंतर आता राजस्थानातही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवान अधिक सतर्क झाले आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब