शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा यू-टर्न; फक्त एक वैमानिक ताब्यात असल्याचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 21:38 IST

दुपारी दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता

नवी दिल्ली: जुने फोटो दाखवून खोटी माहिती देणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा समोर आला आहे. आज सकाळी भारतीय हवाई दलानं कारवाई केल्यानंतर दोन भारतीय वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. मात्र संध्याकाळी पाकिस्ताननं आपल्या ताब्यात फक्त एकच वैमानिक असल्याचं म्हटलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. एका वैमानिकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला पाकिस्तान भारतीय वैमानिक समजत होता. मात्र तो पाकिस्तानी हवाई दलाचा वैमानिक निघाला, अशी माहिती समोर आली. 'पाकिस्तानच्या ताब्यात केवळ एकच वैमानिक आहे. लष्करी कायद्यानुसारच विंग कमांडर अभिनंदन यांना वर्तणूक दिली जात आहे,' असं ट्विट गफूर यांनी केलं. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावलं. भारतीय वैमानिकाला कोणताही त्रास होता कामा नये, अशी समज त्यांना देण्यात आली. अभिनंदन यांची सुखरुप सुटका करा, असंदेखील त्यांना सांगण्यात आलं. यावेळी भारताकडून पाकिस्तानच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पाकिस्तानची कृती अतिशय दुर्दैवी असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना सुनावलं. 'भारतानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलं. मात्र पाकिस्ताननं भारताविरोधात कारवाई करताना आक्रमक पवित्रा घेतला,' अशा शब्दांमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांची कानउघाडणी करण्यात आली. जखमी जवानाला पाकिस्ताननं दिलेली वर्तणूक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचं आणि जेनेव्हा कायद्याचं उल्लंघन करणारी असल्याचं म्हणत भारतानं जोरदार आक्षेप नोंदवला.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpilotवैमानिक