शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

राफेल प्रकरणात राजनाथ सिंहांच्या बचावासाठी पाकिस्तानी सेना आली पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:44 IST

राफेल लढाऊ विमानांच्या शस्त्रपूजेदरम्यान राजनाथ सिंहांनी त्यांच्या चाकांखाली लिंबू ठेवल्यानं ते वादात सापडले होते.

नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांच्या शस्त्रपूजेदरम्यान राजनाथ सिंहांनी त्यांच्या चाकांखाली लिंबू ठेवल्यानं ते वादात सापडले होते. अंनिसनंही या प्रकारावरून राजनाथ सिंहांवर टीकास्त्र सोडलं होतं, परंतु आता त्यांच्या बचावासाठी पाकिस्तानी सेना पुढे सरसावली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून नेहमीच भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तान चक्क राजनाथ सिंहांच्या बाजूनं उभं राहिलं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी गुरुवारी राफेलच्या शस्त्रपूजेवरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा बचाव केला आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावर पाकिस्तानचे सैन्य प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी राफेलची केलेली शस्त्रपूजा ही धर्मसंगत आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. राफेलच्या विमानांची पूजेत कोणतीही चूक झालेली नाही. कारण ती धर्मशास्त्रानुसार करण्यात आली होती. खरं तर फक्त या विमानांचं महत्त्वाचं नसतं, तर ती हाताळणाऱ्या व्यक्ती, त्यांचा उत्साह आणि संकल्पाला महत्त्व असते.  विशेष म्हणजे पाकिस्तान सेनेकडून हे विधान अशा वेळी आले, जेव्हा दोन्ही दक्षिण आशियाई देशांत तणाव विकोपाला गेलेला आहे. भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झालेला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान ताब्यात घेताना या लढाऊ विमानाची पूजा केली होती.  विजयादशमी दिवशी संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या राफेल पूजनामुळे वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या पूजेवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या पूजेवर टीका केली होती. या राफेल पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की,  ''मला जे योग्य वाटले तेच मी केले. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी आमची श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणासून या गोष्टीवर विश्वास आहे, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे. यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ''मला वाटते की, या प्रकरणात काँग्रेसमध्ये सुद्धा मतभिन्नता असावी. कुठल्याही विषयावर सर्वांचं एकमत असेलच, असे नाही.'' दरम्यान, राफेल विमान भारताच्या ताब्यात आल्याने भारतीय हवाई दलाच्या संरक्षण आणि आक्रमकतेच्या शक्तीत वाढ होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRajnath Singhराजनाथ सिंह