शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकने ड्रोनद्वारे भारतात टाकल्या रायफली; चिनी बनावटीच्या आठ ड्रोनचा केला वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:54 IST

काश्मिरी अतिरेक्यांना खलिस्तानींची मदत

चंदिगढ : पाकिस्तानातील खलिस्तानी दहशतवादी संघटनेने चिनी बनावटीच्या आठ ड्रोनद्वारे ९ ते १६ सप्टेंबर या काळात ८० किलो वजनाची शस्त्रास्त्रे, रायफली व दारूगोळा भारतात पोहोचवल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी ही शस्त्रे पाठविण्यात आली होती, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा असलेला खलिस्तान झिंदाबाद फोर्स (केझेडएफ) ही संघटना लाहोर व जर्मनीत सक्रिय आहे. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. केझेडएफचा जर्मनीतील गुरमीतसिंह बग्गा, पाकमधील प्रमुख रणजीतसिंग यांच्या पुढाकाराने या कारवाया सुरू आहेत.तरणतारण जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी घातलेल्या धाडीत २२ शस्त्रास्त्रे जप्त केली. अमृतसर, तरणतारण येथे ड्रोनने ही शस्त्रे पोहोचविल्याची माहिती चौकशीतून उघड झाली. या तस्करीसाठी वापरलेले व अर्धवट जळालेले ड्रोनही पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी शुभदीप (२२ वर्षे) याला पंजाब पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तो अमृतसर जिल्ह्यातील असून, तेथील कारागृहातील मानसिंग व आकाशदीप यांनी त्याला दहशतवादी मार्गाकडे वळविले. तरणतारण जिल्ह्यातील चोहला साहिब गावातून आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची कारही जप्त करण्यात आली.चिनी बनावटीच्या ड्रोनला १० किलो वजनाची शस्त्रे, दारूगोळ््याची पिशवी बांधून ते पाकिस्तानातून पंजाबमध्ये धाडण्यात आले. भारताच्या सीमेपासून दोन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या गावातून हे ड्रोन पाठविण्यात आले. दोन हजार फूट उंचीवरून ५ किमीचे अंतर कापून ड्रोन भारतीय हद्दीत आले. तिथे ड्रोनला बांधलेली शस्त्रांची पिशवी उतरवण्यात आली आणि हस्तकांनी ती ताब्यात घेतली.मोदी, डोवाल लक्ष्य?हद्दीवर बीएसएफच्या जवानांचा पहारा असतो. तिथेही रडारावरून लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी