शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 19:17 IST

सीमावर्ती भागातील लोकांनी बंकरची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.

Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचचली आहेत. त्यामुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्याचा परिणाम जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती गावांमध्येही दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील लोकांनी बंकरची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सीमेवर युद्धाची तयारी सुरु झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. कोणत्याही कारवाई दरम्यान, आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगामधील हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान, सीमेजवळ राहणाऱ्या लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई करण्यात येत आहे. सीमेवर गोळीबार असो किंवा युद्ध, या काळात काश्मिरी लोक आपले घर सोडून सुरक्षित बंकरमध्ये राहतात.

पूंछ जिल्ह्यातील सीमेजवळ राहणाऱ्या गावांमध्ये सध्या गावकरी त्यांचे बंकर स्वच्छ करण्यात आणि आवश्यक वस्तू गोळा करण्यात व्यस्त आहेत. हे बंकर भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांनी बांधले गेले आहेत. या बंकरमुळे त्यांना गोळीबाराच्या वेळी गाव सोडून पळून जावे लागणार नाही आणि आम्ही स्वतःच्या गावात सुरक्षितपणे राहू शकू असे गावकरी सांगत आहेत.

"आधी तर आम्ही भाकित करु शकत नव्हतो की सीमेवर गोळीबार केव्हा होईल. इथे कधीही काहीही होऊ शकतं. म्हणून, घरगुती बंकर बहुतेक तयार मिळतात. पण आपल्याला मोठे बंकर तयार करावे लागतात. पहलगाममध्ये जे झालं त्याला उत्तर नाही दिलं ती शरमेची बाब ठरेल. आम्ही सीमेवर राहतो त्यामुळे जे काही होईल त्याचा परिणाम आमच्यावर होणार आहे. आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नाही. आता जे व्हायचे आहे ते आरपार होऊ द्या. कारण त्यांनी जे केलं आहे त्यांच्या दुःखासमोर आमचे दुःख काहीच नाही. आम्हाला त्यांना अजिबात असे वाटू द्यायचे नाही की सीमावर्ती भागातील लोक सुरक्षित असतील की नाही. म्हणून, आम्ही हे बंकर तयार करत आहोत," असे एका महिलेने सांगितले.

भारत सरकारने बांधलेले हे बंकर केवळ खूप मजबूत नाहीत तर बुलेटप्रूफ देखील आहेत. हे जमिनीपासून १० फूट खाली बांधले गेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळीबाराची किंवा हल्ल्याची भीती नाही. कारगिल युद्धादरम्यान आम्हाला स्थलांतर करावे लागले होते, पण आता बंकरमुळे आम्ही आमच्या गावात सुरक्षित आहोत, असेही गावकऱ्यांनी म्हटलं. महिलांकडून बंकरमध्ये गॅस सिलिंडर, रेशन, ब्लँकेट आणि बेडिंग इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर