शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:12 IST

Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: भारताने कठोर पावलं उचलताच पाकिस्तानने अरबी समुद्रात केली होती मिसाइल चाचणीची घोषणा

Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: पहलगाममध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. कायदेशीर व राजकीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी ( Pakistan ) केल्यानंतर, आता लष्करी पातळीवरही तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाने एक मोठी कामगिरी केली आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढणार

भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौके INS सुरतने समुद्रात वेगाने उडणाऱ्या आणि लक्ष्यावर अचूक हल्ला करणाऱ्या Destroyer क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. या कामगिरीमुळे नौदलाची ताकद आणखी बळकट झाली आहे. हे यश स्वदेशी युद्धनौकेची रचना, विकास आणि ऑपरेशन्समध्ये भारतीय नौदलाची वाढलेली ताकद दर्शवते. यामुळे संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारताचे स्वप्न आणखी सामर्थ्यशाली होत आहे.

अरबी समुद्रात केलेली चाचणी महत्त्वाची का?

अरबी समुद्रात Destroyer मिसाइची झालेली यशस्वी चाचणी खूप महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तान देखील त्याच भागात क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या जलद निर्णयांमुळे पाकिस्तान बिथरला आहे. तशातच पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार असून या संदर्भात त्यांनी एक अधिसूचनाही जारी केली आहे.

पाकिस्तान मिसाईल चाचणीच्या तयारीत

पाकिस्तानने अरबी समुद्राच्या क्षेत्रात क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असेल आणि त्याची चाचणी २४-२५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावर केली जाईल. भारतातील तपास संस्था या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत, गृह मंत्रालयातील गृह सचिवांसोबत रॉ आणि आयबी प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक झाली आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतindian navyभारतीय नौदल