शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:42 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने व्हिसावर भारतात आलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचे आदेश दिले आहेत.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. देशातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास/ तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानींपैकी काही परतले आहेत, तर काही अजूनही सीमेवर परतण्याची वाट पाहत आहेत.

आतापर्यंत किती नागरिक परतले ?भारताच्या कडक भूमिकेनंतर आता पाकिस्तानात असलेले भारतीयही पाकिस्तानातून मायदेशात परतत आहेत. गेल्या तीन दिवसांत अटारी-वाघा सीमेवरुन 450 हून अधिक भारतीय आपल्या मायदेशी परतले आहेत. तर, अटारी सीमेवर पाकिस्तानात परतणाऱ्या लोकांची मोठी गर्दी आहे. सरकारचा अल्टिमेटम संपण्यापूर्वी प्रत्येक पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात परतण्यासाठी मिळेल त्या वाहनाने सीमेकडे जात आहे.

आज शेवटचा दिवसभारत सरकारच्या आदेशानुसार, व्हिसावर येथे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात परतण्यासाठी आज(27 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. ही मुदती लक्षात घेऊन राज्य सरकारे त्यांच्या भागात असलेल्या पाकिस्तानी लोकांचा शोध घेत आहेत अन् त्यांना परत पाठवत आहेत. दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

मुदत संपल्यानंतर कारवाई होणारभारत सरकारची अंतिम मुदत संपल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांचे वास्तव्य बेकायदेशीर मानले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर