पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतप्त आहे, अनेक लोकांनी काश्मीरला जाणारी तिकिटंही रद्द केली आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गोळीबार सुरू असताना एक लहान मुलगा एका चिमुकल्याला उचलून घेऊन चालताना दिसत आहे.
पहलगामच्या या व्हिडिओमध्ये काही लोक घाबरलेले दिसत आहेत, तर एक काश्मिरी मुलगा त्यांच्या मागे एका मुलासह चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ हल्ल्यानंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मागून गोळीबाराचे आवाज येत आहेत. तो काश्मिरी मुलगा हात वर करून म्हणतो, "मी येतोय, काळजी करू नका."
"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
व्हिडिओमध्ये, एक महिला ओरडत असल्याचं ऐकू येतं, जी पूर्णपणे घाबरलेली आहे. हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे, लोक या मुलाचं भरभरून कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे सर्वजण या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा दलांनी काल रात्री बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनी भागात लष्कर-ए-तोएबा (LET) चा दहशतवादी जमील अहमद याचं घर उद्ध्वस्त केलं आहे.
Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. याआधी शनिवारी रात्री सुरक्षा दलांच्या पथकाने दहशतवादी अदनान शफीचं घर पाडलं होतं. अदनान २०२४ मध्ये लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि गेल्या एक वर्षापासून तो सक्रिय होता. काही काळापूर्वीच कुपवाडा येथील सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचं घर तीन सेकंदात उडवून दिलं होतं. फारुख सध्या पाकिस्तानात लपून बसला आहे आणि तिथून दहशतवादी कारवाया करत आहे.