Pahalgam Terror Attack : केंद्र सरकारनेजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश जारी केले असून, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून हे प्रकरण एआयएकडे सुपूर्द केले जात आहे. हा हल्ला पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने त्यांच्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) च्या माध्यमातून केल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, एनआयए आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची पुन्हा नोंदणी करेल आणि औपचारिक तपास सुरू करेल. महत्वाचे म्हणजे, आयजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील एनआयए टीम 23 एप्रिलपासूनच स्थानिक पोलिसांना मदत करत आहे. या हल्ल्यामागील व्यापक दहशतवादी नेटवर्क आणि कट उलगडण्यासाठी एनआयए लवकरच सखोल तपास सुरू करेल.
एनआयए पीडितांचे जबाब नोंदवत आहेगेल्या काही दिवसांपासून एनआयए हल्ल्यातील वाचलेल्यांचे जबाब नोंदवत आहे. तसेच, लष्कर, जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित अटक केलेल्या दहशतवादी आणि स्थानिकांचीही चौकशी केली जात आहे. तर, तिकडे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक 26 निष्पाप पर्यटकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.
हल्ल्यात पाकिस्तानचा सहभागभारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद आणि कराची येथील सेफ हाउसमध्ये हल्ल्याचे डिजिटल पुरावे शोधूले आहेत, ज्यामुळे हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. हा हल्ला देखील मुंबई 26/11 स्टाईल कंट्रोल-रूम ऑपरेशनच्या धर्तीवर करण्यात आला असल्याचे मानले जाते. फॉरेन्सिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींच्या अहवालांवरून असे दिसून आले आहे की, हा हल्ला 4-5 दहशतवाद्यांनी केला. ते सर्वजण अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते. आता एनआयए या घटनेचा विविध बाजूंनी तपास करेल.