शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:19 IST

पाकच्या सहभागाचा ठोस पुरावा हाती, ज्या वेगाने ही आश्रयस्थाने सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्याने हटवली त्यावरून यामागे कुटिल षडयंत्र असल्याचे दिसून येते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालातून पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामागे हात असल्याचा ठोस पुरावा हाती लागला आहे. या अहवालात हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संबंध प्रस्थापित करणाऱ्या दोन पकडलेल्या संभाषणांचा तपशील आहे.

या अहवालानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. या संभाषणावरून मुझफ्फराबाद व कराचीच्या आश्रयस्थानांशी जोडलेल्या डिजिटल फूटप्रिंट्सशी संबंध असल्याचे दिसून आले. ज्या वेगाने ही आश्रयस्थाने सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्याने हटवली त्यावरून यामागे कुटिल षडयंत्र असल्याचे दिसून येते. डिजिटल ट्रॅकिंग काही तासांतच करण्यात आले. 

२० लाखांचे बक्षीस जाहीर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांचे रेखाचित्रे जारी केली आहेत. पोलिसांनी दोन संशयितांची ते पाकिस्तानी नागरिक असल्याची ओळख पटवली असून आणि त्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अहवालात काय? बिजबेहरा येथील आदिल हुसेन ठोकर आणि त्राल येथील आसिफ शेख या दोन स्थानिकांचा सहभाग उघड झाला आहे. आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता. तो या वर्षीच परतला होता. परंतु आसिफबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान