शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:17 IST

जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.

पहलगाम - पहलगामच्या बैसरन घाटीत सोमवारची संध्याकाळ अचानक दहशतीत बदलली. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला; पण कोणीही गोळीबार करताना दिसले नाही. लोक एकमेकांवर पडून आणि चिरडून लोक फक्त चार फूट रुंद दरवाजातून जंगलाकडे धावत होते.

तिलक रूपचंदानी यांच्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी टेकडीवरून उडी मारली आणि तिचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. तिलक रूपचंदानी म्हणाले की, बराच वेळ गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता; पण मागे वळण्याची हिंमत कोणातच झाली नाही. त्यांच्या पत्नीने सांगितले की, गर्दीत त्यांना शोधण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता. चार-पाच हजार लोक देवाचे नाव घेत पुढे जात राहिले. जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.

हिंदू नाव ऐकताच गोळीबारहल्लेखोरांनी प्रथम नाव विचारले आणि हिंदू नाव ऐकताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोधमोहीम सुरू केली आहे. जखमींवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यात अनेक लोक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडले आहेत. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्यांच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसत होते. काही पर्यटक या हल्ल्यामुळे खूप हादरले होते व स्थानिक नागरिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.

हल्ल्याची बातमी कळताच पहलगामचे रस्ते ओस पडलेदहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच पहलगाममधील रस्ते ओस पडले. मोठ्या संख्येने तिथे आलेले पर्यटक सुरक्षितस्थळी रवाना झाले. २००० मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३० पेक्षा अधिक जण ठार, ६० जण जखमी झाले. त्यानंतर २००१ मध्ये शेषनाग येथे १३ जण ठार, १५ जखमी आणि २००२ मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या ८ यात्रेकरूंवर गोळीबार करण्यात आला.

अनेक पर्यटक जमिनीवर पडले रक्ताच्या थारोळ्यातहल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीने हा हल्ला करण्यात आला.. जंगलातून काही दहशतवादी आले व त्यांनी ४० पर्यटकांना घेराव घालून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराला सुरुवात होताच येथील स्थानिकांनी जीव वाचविण्यासाठी तिथून पलायन केले. मात्र, पर्यटकांना तिथून निसटणे शक्य झाले नाही. या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

३ जुलैपासूनच्या अमरनाथ यात्रेत हवी कडक सुरक्षाकाश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी हा भीषण हल्ला झाला. येत्या ३ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, ती ३८ दिवस चालणार आहे. पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला