Pahalgam Terror Attack Update: जम्मू काश्मीरमधील पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली. हे दहशतवादी २०२३ पासून लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लष्कराने जून २०२३ पासून लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे दोन मजली घर आयईडी स्फोटके लावून पाडले. तो पुलवामातील मुर्रान येथील रहिवासी आहे. अशीच कारवाई सुरक्षा दलाने २ वर्षांपूर्वी लश्कर ए तोयबामध्ये दाखल झालेल्या आणखी एका दहशतवाद्याविरोधात केली.
वाचा >>अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
स्फोटके लावून घरं जमीनदोस्त
लश्कर ए तोयबाचा दहशतवादी शाहीद अहमद याचे शोपिया जिल्ह्यातील चोटीपोरा परिसरात असलेले घर सुरक्षा दलाने स्फोटके लावून पाडले. पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
कुलगाम येथील क्विमोहमध्ये जाकीर गनी याचे घरही शुक्रवारी रात्री पाडण्यात आले. जाकीर गनी हा २०२३ मध्ये लश्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता.
घरे पाडण्यात आलेले ते पाच दहशतवादी कोण?
आदिल थोकर (बिजबेहरा)
आसिफ शेख (ट्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहीद अहमद (शोपिया)
जाकीर गनी (कुलगाम)
आदिल थोकरने रचला होता बैसरनमधील हल्ल्याचा कट?
आदिल थोकर ऊर्फ आदिल गुरी असे नाव असलेल्या दहशतवाद्यानेच बैसरनमध्ये पर्यटकांची हत्या करण्याचा कट रचला आणि तो हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.