शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:33 IST

Syed Adil Hussain Shah: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये जो हल्ला झालाय, त्यात दहशतवाद्यांनी एका मुस्लीम तरुणाचीही हत्या केलीये. त्याची आई, पत्नी आणि वडील आता न्याय मागत आहेत.

पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांपैकी एक आहे, सईद अदिल हुसैन शाह. अदिलच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अदिलची हत्या झाल्याचे कळताच त्याच्या आईने आणि पत्नी टाहो फोडला. त्याचे वडील म्हणाले की, तो एकमेव कमावता होता. आम्हाला न्याय हवाय. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या सईद अदिल हुसैन शाह याच्या वडिलांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. सईद हैदर शाह असे मयत तरुणाच्या वडिलांचे नाव आहे. 'माझा मुलगा निर्दोष होता. त्या भेकडांनी त्याला मारून टाकलं', असे ते म्हणाले. 

अदिल करायचा घोडे चालवण्याचे काम  

सईद हैदर शाहांनी सांगितले की, 'माझा मुलगा पर्यटकांना घोड्यावरून ने-आण करायचा. मंगळवारी तो पर्यटकांना घेऊन येण्यासाठी गेला होता. मला दुपारी तीन वाजता कळले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.' 

वाचा >>पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक

'हल्ला झाल्याचे कळताच मी त्याला कॉल केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. काही वेळाने मी पुन्हा कॉल केला. कॉल लागला पण, उचलत नव्हता. त्यामुळे मी लगेच पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार दिली', असे सईद हैदर शाह म्हणाले. 

जाऊन बघितलं तर त्याचा मृत्यू झाला होता

शईद हैदर शाह म्हणाले, 'मला नंतर कळलं की, तो जखमी झाला आहे आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यामुळे मी रुग्णालयात गेलो. तिथे जाऊन बघितलं तर त्याचा मृत्यू झाला होता.'

घरात तोच कमावणारा होता

'माझा मुलगा निर्दोष होता. त्याला का मारलं? घरात सगळे लहान आहेत. तो मोठा होता आणि घरात तोच कमावता व्यक्ती होता. पर्यटकांना घोड्यावरून ने-आण करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याचं लग्न झालंय. आम्हाला न्याय हवाय. ज्याने कुणी त्याची हत्या केली त्याला शिक्षा झाली पाहिजे', असे सईद हैदर शाह म्हणाले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर