शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:05 IST

Pahalgam Attack: पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता.

जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात लोकांमध्ये पाकिस्तानविरोधात राग आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे, त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. अशातच सीमा हैदर चर्चेत आली आहे. तिला देखील नेटकरी देश सोडून जाण्यास सांगत आहेत. 

पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. फेसबुकवर गेम खेळता खेळता रबूपुराच्या सचिन मीणा याच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून ती मुलांसह भारतात आली. तिला पाकिस्तानला पाठवा असा सूर नेटकऱ्यांनी आळविला आहे. प्रसारमाध्यमांनी सीमाला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला परंतू तिने यावर काही उत्तर दिले नाही. 

सीमा हैदर चार पाकिस्तानी मुलांना घेऊन भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत संसार थाटला होता. या दोघांना १८ मार्चला मुलगी झाली आहे. या मुलीचे नाव मीरा असे ठेवण्यात आले आहे. सीमासोबत त्याने हिंदू पद्धतीने लग्न केले होते. मीरा ही सीमाची पाचवी तर भारतातील पहिले अपत्य आहे. 

सीमा पाकिस्तानला जाणार की नाही...सीमाने फसविल्याने सीमाचा पती तिकडे संतापलेला आहे. भारत सरकारकडे त्याने अनेकदा सीमाला आपल्या हवाली करावे अशी मागणी केली आहे. अशातच सीमा हैदर पाकिस्तानला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आह, परंतू सीमा पाकिस्तानला जाणार नाही. कारण तिच्यावर इथे खटला सुरु आहे. यामुळे हा नियम तिच्यावर लागू होत नाही, असे रबुपुराचे पोलीस उपनिरीक्षक हरेंद्र मलिक यांनी म्हटले आहे. 

सीमाचे वकील एपी सिंह यांनी देखील ती जाणार नसल्याचे म्हटले आहे. ती न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन करत आहे. भारतात ती मुलांसह शरणार्थी म्हणून आहे. पाकिस्तानात तिला मारण्याची धमकी देत होते, दहशतवादी हल्ल्यासारखीच ती परिस्थिती होती, असे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला