शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:46 IST

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी पर्यटकांना मोठा धीर देत त्यांना योग्य ती मदत पुरवली

Pahalgam Attack: मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एका नागरिकाचा समावेश आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांना सांभाळण्यासाठी काश्मिरी लोक पोहोचले होते. त्यांनी पर्यटकांना धीर दिला. हल्ल्याची माहिती मिळताच काश्मीरमधील लोक पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे आले. काश्मिरी लोकांनी पर्यटकांना त्यांच्या घरात आश्रय दिला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक काश्मिरी तरुण एका जखमी पर्यटकाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले. ओळख पटवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी  सहा पुरुषांची तर त्यांच्या पत्नीसमोरच निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पहलगाम येथील शाल विक्रेता सज्जाद अहमद भट एका जखमी पर्यटकला खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे. सज्जाद अहमद भटच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सज्जाद एका जखमी मुलाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे. या घटनेनंतर सज्जादने सांगितले की, आधी माणुसकी आहे मग धर्म येतो. "पहलगाम पोनी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वान यांनी आमच्या गटाला बैसरन व्हॅलीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल मेसेज पाठवला होता. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि दुपारी ३ च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही तिथल्या जखमींना पाणी दिले आणि ज्यांना चालता येत नव्हते त्यांना उचलून घेतले. पर्यटकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, कारण ते  पाहुणे आहेत आणि आमचं घर त्यांच्यावर अवलंबून आहे. माझ्यासाठी धर्माच्या आधी माणुसकी येते. आम्ही त्यापैकी अनेकांना रुग्णालयात आणले. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नव्हती कारण आम्ही तिथे गेलो तेव्हा लोक मदतीसाठी याचना करत होते. पर्यटकांना रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या इथे येण्यानेच आमच्या घरातील चूल पेटते. धर्माच्या आधी माणुसकी पाहिली पाहिजे. तु्म्हाला आम्हाला एकटे सोडू नका. तुम्ही आमचे भाऊ आहात. त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे," असे सज्जाद अहमद भटने सांगितले.

दरम्यान, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. "ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांना कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळूनच राहणार. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला