शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:43 IST

बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने धेबवलिया गावातून दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नौदलाचे अधिकारी मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा एआयद्वारे अश्लील व्हिडीओ बनवून तो युट्यूबवर टाकणाऱ्या नराधम पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

बिहारच्या गोपालगंज पोलिसांच्या मदतीने धेबवलिया गावातून दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी या दोघांना अटक करण्यात आली आहे. एसएस रियल पॉइंट' नावाच्या यूट्यूब चॅनलवर नरवाल यांच्या पत्नीचा एआय व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. चेहरा मॉर्फ करून हा व्हिडीओ बनविण्यात आला होता. हरियाणाच्या गुरुग्राम सायबर पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दोन्ही आरोपींना गोपाळगंज येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात या दोघांनी यापूर्वीही असेच व्हिडीओ बनवून ते युट्यूबवर अपलोड केल्याचे आढळले आहे. या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दिशेने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

न्यूझीलंडच्या एका महिला खासदाराने आपलाच एआय न्यूड फोटो संसदेत दाखवून या गुन्हेगारीविरोधात कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. केवळ एकाच देशात नाही तर जगभरात अशा एआय कृत्यांवर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. पहलगाम हल्ल्यातील पीडितेचा असा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे म्हणजे नीचपणाचा कळस असल्याचे सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे. अशा विकृत लोकांची विकृती ठेचण्याचीही मागणी केली जात आहे.  

पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांपूर्वीच विनय नरवाल यांचे लग्न झाले होते. हे जोडपे हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. दहशतवाद्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली होती, तसेच पत्नीला जाऊन मोदांना सांग असेही म्हटले होते. एकूण २६ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळेच भारताने पाकिस्तानवर स्ट्राईक करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाterroristदहशतवादी