शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पान ७ - क्राईम स्टोरी

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

भोंदू डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

भोंदू डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
मडगावात पोलिसांची धडक मोहीम : धाबे दणाणले, बाडबिस्तारा गुंडाळला

सूरज पवार : मडगाव
पोलिसांच्या कारवाईमुळे भोंदू डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. अनेक वर्षे मडगाव भागात बिनबोभाटपणे डॉक्टरगिरी करणार्‍या या भोंदंूवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात मडगाव पोलिसांनी दोन बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे करून त्यांची रवानगी कोठडीत केली. वैद्यकीय शिक्षण न घेता डॉक्टरगिरी करणार्‍या या भोंदूंवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांचे एक रॅकेटच राज्यात कार्यरत असून, त्यांच्या जाहिरातबाजीला भुलून अनेकजण या डॉक्टरकडून उपचार करून घेतात व नंतर फसवणूक झाल्यावर पश्चातापात पडत असल्याचेही उघड झाले आहे. लोकलज्जेस्तव अनेकजण या डॉक्टरांविषयी तक्रार करण्यास धजावत नाहीत. लोकांच्या याच मानसिकतेचा हे ढोंगी डॉक्टरही पुरेपूर फायदा उठवीत होते. आता पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे या प्रकाराला आळा बसू शकतो. कारवाईमुळे अनेक भोंदू डॉक्टरांनी शहरातून आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.
सी.एल. पाटील यांनी मडगाव पोलीस ठाण्याचा ताबा घेतल्यानंतर अशा भोंदू डॉक्टरांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू केले. एकाच आठवड्यात दोन भोंदू डॉक्टरांवर कारवाई करून त्यांना खाकी हिसका दाखवला. एरव्ही एखाद्या निष्णात डॉक्टरांच्या अविर्भावात वावरणारे हे तथाकथित डॉक्टर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मात्र आपले तोंड लपवून बसले होते.
आके येथे गेली अनेक वर्षे टिकू क्लिनिकच्या नावे दवाखाना उघडून बसलेल्या असित बिस्वास (४३) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र नव्हते. आके भागात कित्येक वर्षे त्याचा व्यवसाय चालू होता. वर्तमानपत्रात जाहिराती देऊन तो गिर्‍हाईकाला आपल्याकडे आकर्षित करत होता, असेही तपासात उघड झाले आहे. एरव्ही असाध्य रोग बरा करू,अशी जाहिरात करणार्‍या असित बिस्वास याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लागलीच त्याचा रक्तदाब वाढला व त्याला हॉस्पिसिओ इस्पितळाचा आधार घ्यावा लागला.
त्यानंतर दोन दिवसांनंतर मडगाव पोलिसांनी नावेली येथे अशाच एका बोगस डॉक्टरची मान पकडली. केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला चिन्मयकुमार ऊर्फ सी.के. बिस्वास (४७) हा १९८९ पासून गोव्यात डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत होता, असे तपासात उघड झाले आहे. नावेली येथे बिस्वास क्लिनिक नावाने त्याने क्लिनिक सुरू केले होते. मूळव्याधीसारखी व्याधी विनाऑपरेशन बरी करून देतो, अशी त्याने जाहिरात केली होती. अनेकजण या जाहिरातीला भुलून त्याच्याकडून उपचार करून घेत होते. मूळ कोलकाता येथील चिन्मयकुमार बिस्वासने गोव्यात आपले चांगलेच बस्तान बसवले होते. त्याच्याकडे अनेक प्रतिष्ठित लोकही उपचारासाठी येत होते, असेही पोलिसांना तपासात आढळले आहे.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने सुरुवातीला आपल्याकडे आयुर्वेदिक, ॲलोपॅथीची पदविका असल्याचा आव आणला. या विषयात आपण तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर हा तोतया डॉक्टर खरे बोलायला लागला. केवळ दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्याची एका दमात त्याने कबुली दिली.
गोवा वैद्यकीय व्यावसायिक कायदा कलम ३, ५, १५ अंतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण न करता वैद्यकीय व्यवसाय करणे, हा गुन्हा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांनी दिली. भोंदू डॉक्टरांवर कारवाईचे सत्र सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाने अशा संबंधित भोंदू डॉक्टरांविरुध्द कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
---------
बॉक्स
बिस्वास नावाचा गैरफायदा
पश्चिम बंगालमध्ये अनिल बिस्वास नामक एका प्रतिष्ठित डॉक्टरने आयुर्वेदिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. देश-विदेशात या डॉक्टरची ख्याती पसरलेली आहे. आडनावाचा गैरफायदा उठवून अनेक लोक डॉ. बिस्वास यांच्या नावे दवाखाना उघडत असल्याचे पोलिसांना तपासात आढळले आहे. पोलिसांनी भोंदू डॉक्टरांवर कारवाई सुरू केल्यामुळे जडीबुटीच्या नावाखाली लोकांवर उपचार करणार्‍या अनेकांनी आता आपला गाशा गुंडाळला आहे. वाहन रस्त्याकडेला ठेवून ही मंडळी हा बेकायदा धंदा करत होती.